रावगाव येथील राजीव गांधी वाचनालयाकडून डाॅ. आंबेडकर यांना अभिवादन
करमाळा (दि.६) – भारतीय घटनेचे शिल्पकार ,विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव येथे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच संदीप शेळके, उपसरपंच भाऊसाहेब करगळ, ग्रामविस्तार अधिकारी रामदास हजारे, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा रावगाव चे मुख्याध्यापक बबन पाटूळे,माजी पंचायत समित सदस्य विलास मुळे,ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब पवार, मुंबई सञन्यायालयातील अॅड राहूल कांबळे, माजी सैनिक शहाजी ओहोळ, कामगार सेल भाजपा प्रणीत ज्ञानेश्वर पवार, गाव कामगार कोतवाल बाजीराव पवार, आदि मान्यवर व ग्रामस्थ वाचकवर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचेवरील लिखीत ग्रंथाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते, याचा लाभ शालेय विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यक्रमसाठी राहूल पवार व प्रकाश कांबळे यांनी परिश्रम घेतले.आभार सचिव भास्कर पवार यांनी मानले