संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानचे विभागीय उपायुक्त विजयराव मुळे यांची मांगी गावाला सदिच्छा भेट
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – पुणे विभागीय उपायुक्त विजयराव मुळे यांनी काल (दि.२१) मांगी (ता.करमाळा) येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी मांगी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल,श्रीफळ,हार सह फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
श्री. मुळे हे पुर्वी करमाळा तालुक्यामध्ये बिडिओ म्हणून कार्यरत असताना मांगी हे गाव हागणदारी मुक्त, स्वच्छता अभियानासाठी त्यांनी दत्तक म्हणून घेतले होते. त्यावेळी त्यांनी चांगल्या प्रकारे काम या भागात केले होते.
खडकी (ता.करमाळा) येथील संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी त्यांची कमिटी काल आली होती. यावेळी मांगी येथील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व ग्रामस्थांना भेट देण्यासाठी ते आले होते.
यावेळी मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते मांगी ग्रामपंचायत सदस्य सुजित बागल, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल अवचर, अनिल बागल निळकंठ बागल, वैभव बागल,मच्छिंद्र बागल संभाजी राजे बागल, अभिमान अवचर अॅड. बागल, ग्रामसेवक मोकाशी,श्री नलवडे यांच्या सह मांगी ग्रामस्थ उपस्थित होते.