तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत हिवरवाडी शाळेची चमकदार कामगिरी

0

करमाळा : पंचायत समिती करमाळा (शिक्षण विभाग) यांच्या वतीने वीट येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवरवाडीच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी कामगिरी करून ठसा उमटवला.

कबड्डी प्रकारात लहान मुलांच्या गटाने प्रथम क्रमांक मिळवला, तर लहान मुलींच्या गटाने द्वितीय क्रमांक पटकावला. बुद्धिबळ स्पर्धेत किंजल मिलिंद कांबळे हिने प्रथम क्रमांक, तर २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत स्वराली राजेंद्र इरकर हिने प्रथम क्रमांक मिळवला.

तालुक्यात विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, जातेगाव केंद्रप्रमुख रमाकांत गटकळ, मुख्याध्यापक रंगनाथ देशमाने, तसेच नितीन व्हटकर, नाना वारे, निर्मला पाटूळे, दिपाली गायकवाड आणि क्रीडा मार्गदर्शक नवनाथ माने यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेस उपस्थित शिक्षकवर्ग, हिवरवाडीच्या सरपंच वैशाली इरकर, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार व सदस्य, राजमाता ग्रुपचे सदस्य तसेच पालकांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि जिल्हास्तरीय स्पर्धेत यशासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!