जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत हिवरवाडी शाळेच्या किंजलची उल्लेखनीय कामगिरी -

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत हिवरवाडी शाळेच्या किंजलची उल्लेखनीय कामगिरी

0

करमाळा: जिल्हा परिषद शिक्षण विभाग, सोलापूर यांच्या वतीने माढा येथे झालेल्या जिल्हास्तरीय मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवरवाडी (ता. करमाळा) येथील विद्यार्थिनी किंजल मिलिंद कांबळे हिने लहान गटात तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.


किंजलच्या यशाबद्दल करमाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अभिजित कदम, विस्तार अधिकारी सुभाष टकले, जातेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख गणेश गटकळ, शाळेचे मुख्याध्यापक संदीप देशमाने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार आणि हिवरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली इरकर यांनी अभिनंदन केले.
या यशामध्ये वर्गशिक्षिका दीपाली गायकवाड, तसेच शिक्षक नितीन व्हटकर, नाना वारे आणि वैशाली पाटूळे यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेच्या ठिकाणी जि.प. सोलापूर मुख्यालयातील विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, करमाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव आणि विस्तार अधिकारी अजाव डेरे आदी मान्यवरांच्या हस्ते किंजलला विजेची ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!