मच्छिंद्र लोंढे याची शालेय राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड - Saptahik Sandesh

मच्छिंद्र लोंढे याची शालेय राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड

करमाळा (दि.१८) –  करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा विद्यार्थी व त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू   मच्छिंद्र नाथा लोंढे याने विभागीय शालेय मल्लखांब स्पर्धेमध्ये चौथा क्रमांक मिळवला असून त्याची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिनांक 15-11-24 व शुक्रवार 16-11-24 शनिवार रोजी पुणे क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय पुणे विभागीय मल्लखांब स्पर्धा  विभागातील महाराष्ट्र मंडळ, पुणे आयोजीत करण्यात आलेल्या होत्या. या  स्पर्धेतून 19 वर्षाखालील मुलांच्या गटात मच्छिंद्र याने यश मिळविले आहे.

मल्लखांबचे विविध प्रकार सादर करताना

या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा, पुणे शहर , पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर म. न. पा.,अहिल्यानगर जिल्हा, सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा अशा विविध विभागातून ४२ स्पर्धक या स्पर्धेसाठी आले होते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मच्छिंद्र लोंढेला ३०. ०० गुणापैकी २४.१० गुणांक प्राप्त केले व स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक पटकावला. मछिंद्र लोंढे याची मुंबई येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी पुणे विभागातून निवड झाली आहे.

करमाळा येथील तालुका क्रीडा संकुल येथे तो रोज संध्याकाळी 3-4 तास सराव करत होता. त्रिमूर्ती क्लबचे सागर शिरसकर तसेच महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. राम काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी कामगिरीबद्दल  विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड,संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!