वडशिवणे येथील ऋतुजा कोंडलकरची जिल्हास्तरीय कुस्ती साठी निवड

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) -करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत हायस्कूल मध्ये झालेल्या तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये वडशिवणे येथील अजितदादा पवार विद्यालय ची विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा कोंडलकर हिने ३५ कि. वजन गटामध्ये कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून तिची जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला क्रिडा शिक्षक भागवत सर व सुदाम कुडै यांचे मार्गदर्शन लाभले.
तिने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव मारूती पारखे मुख्याध्यापक श्री भिमराव भोसले,, व सर्व शिक्षक शिक्षकेतर यानी अभिनंदन केले आहे तिचे वडशिवणे परिसरातून कौतुक केले जात आहे


