यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या शिवम चिखलेची विभागीय स्पर्धेसाठी निवड

करमाळा : करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा विद्यार्थी शिवम राजेंद्र चिखले याने धनुर्विद्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर व संत सावता माळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा शालेय धनुर्विद्या स्पर्धा सन २०२५-२६ या ३ ऑक्टोबर रोजी पार पडल्या. या स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात १९ वर्षाखालील वयोगटात शिवम राजेंद्र चिखले (इयत्ता १२ वी विज्ञान शाखा) याने प्रथम क्रमांक मिळवत पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

शिवम याला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभागप्रमुख प्रा. रामकुमार काळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव विलासराव घुमरे, अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिवमचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





 
                       
                      