राजुरी येथील शुभम शिंदे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम

करमाळा दिनांक 14 : राजुरी (ता. करमाळा) येथील शुभम आजिनाथ शिंदे याने तुळजापूर येथे दिनांक 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन प्रकारात 97 किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कुस्तीपटूचा श्री राजेश्वर विद्यालय, राजुरी प्रशालेच्या वतीने गौरव करण्यात आला.

शुभम सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत एडवोकेट बी. डी. हैम्बर्डे महाविद्यालय, आष्टी येथे बी.ए.च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याची पंजाब येथे होणाऱ्या नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याने राजुरी परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

या सत्कार समारंभास प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली विश्वनाथ कोल्हे, वैजनाथ स्वामी सेवा मंडळाचे संस्थापक सचिव लालासाहेब गोविंद जगताप, मारुती साखरे, धनंजय साखरे, रत्नाकर तळेकर, अमोल कोल्हे, विजय गरड, योगीराज पवार, कल्याण बागडे, मारुती शिंदे, आजिनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात राजुरी ग्रामस्थांच्या वतीनेशुभमच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत त्याच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.




 
                       
                      