पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या शिवकालीन मैदानी खेळ स्पर्धेत केममधील खेळाडूंचे यशस्वी सादरीकरण
केम (संजय जाधव) – पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे झालेल्या शिवकालीन मैदानी खेळात तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-काठी,भाला, विटाचक्र या मध्ये या प्रशालेतील कु ईश्वरी पप्पू चेंडगे इ,४थी, स्नेहल पप्पू चेंडगे इ.७ वी, सिद्धि अनिल चेंडगे इ.४, शितल सचिन तळेकर इ.६ वी, सौरभ दत्तात्रय मोरे इ.९ वी या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे सादरीकरण केले असून यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
या विद्यार्थ्यांना स्वराज्य मर्दानी खेळाचे संस्थापक अक्षय दत्तात्रय तळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विदयार्थांचे संस्थेचे अध्यक्ष महेश तळेकर राजाभाऊ तळेकर प्रशालेचे मुखयाध्यापक विनोद तळेकर,शिवाजी प्राथमिक मुखयाध्यापक नागनाथ तळेकर तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेत्र कर्मचारी व केम केंद्राचे केंद्र प्रमुख महेश कांबळे,गटशिक्षणाधिकारी नलवडे साहेब यानी अभिनंदन केले आहे या प्रशालेचे केम व परिसरातून कौतूक केले जात आहे.