सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य माने - प्रा. डॉ. राजेंद्र दास - Saptahik Sandesh

सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य माने – प्रा. डॉ. राजेंद्र दास

0

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील महात्मा फुले पुतळा ते शासकीय विश्रामगृह (सात विहीर) या मार्गावरील…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा ता. 20 : “सर्व सामान्यांना बरोबर घेऊन समाजाची सेवा करणारे व्यक्तिमत्व म्हणजे  प्राचार्य नागेश माने हे आहेत.” असे मत प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ.  राजेंद्र दास यांनी व्यक्त केले.
येथील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नागेश माने यांचा शहरातील विविध संस्थांच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दास बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव  विलासराव घुमरे हे होते तर पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या सभापती पूजा ढेरे या होत्या.
पुढे बोलताना डॉ. दास म्हणाले की..
“श्री. माने हे लहानपणापासून अत्यंत कष्ट जिद्द आणि प्रयत्नाच्या जोरावर आपलं त्यांनी व्यक्तिमत्व फुलवलेले आहे. कमवा आणि शिका योजनातून शिक्षण घेतलेला हा माणूस एका वेळी अर्थशास्त्राचा प्राध्यापक होतो, प्राचार्य  होतो.ते शैक्षणिक कार्यच न करता सर्वसामान्यांना सातत्याने मदत करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल किंवा विवाह जोडण्याचं कार्य असेल किंवा वृक्षारोपण असेल किंवा समाजातील जे काही जुन्या रूढी परंपरा आहे त्याच्याविरुद्ध संघर्ष करण्याचे काम असेल अशा वेगवेगळ्या कार्यातून आणि वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून ते
कार्यरत आहेत.”

अध्यक्षीय भाषण विलासराव घुमरे यांचे झाले तसेच यावेळी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ. ॲड. बाबुराव हिरडे , डॉ. प्रा. संजय चौधरी, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे पाटील यांची भाषणे झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी नवनाथ खरात यांनी केले. तर  कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता लक्ष्मण लष्कर (माजी मुख्याध्यापक) यांच्या गीतातून झाली.

तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्राची सरवदे यांनी केलं तर आभार प्रा. विष्णू शिंदे यांनी मानले. उपस्थितांचे स्वागत राजेंद्र रणसिंग, एन
डी.सुरवसे, कवी खलील शेख, ज्येष्ठ कवी प्रकाश लावंड, माजी मुख्याध्यापक बाळासाहेब गोरे ,डाॅ.अप्पासाहेब लांडगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी कमलाभवानी जगदंबा देवस्थानचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मिलिंद फंड , ग्रामसुधार समितीचे उपाध्यक्ष नाथोजीराव शिंदे, नगरसेविका स्वातीताई फंड, सौ.माने, कीर्तनकार राधाताई भांडवलकर,केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सचिन साखरे,अंगद बिडवे, राजु साने दिगंबर साळुंखे बापू, गोरख पवार ,अशोक यादव,  सचिन साखरे, अशोक काळे, हनुमंत भांडवलकर, बोधे गुरुजी, ढेरे सर, आहेर साहेब, प्रकाश पाटील सर, महादेव मुळे, आप्पा झाकणे, वसंत फंड,  कालिदास फंड,  हरिश्चंद्र झिंजाडे, अशोक अडसूळ, निहाल काळे, सावळाराम फंड, महादेव फंड  अतुल फंड उपनगराध्यक्ष,पत्रकार विवेक येवले, मोरेश्वर पवार,कवी नारायण सोरटे, महादेव भोसले,प्रा. लक्ष्मण राख , डॉ. अरुण जाधव आदि करून मंडळी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!