माजी राज्यमंत्री स्व.दिगंबरराव बागल जयंतीनिमित्त आयोजित कृषी महोत्सव कार्याचा प्रारंभ - विलासराव घुमरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.. -

माजी राज्यमंत्री स्व.दिगंबरराव बागल जयंतीनिमित्त आयोजित कृषी महोत्सव कार्याचा प्रारंभ – विलासराव घुमरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : राज्याचे माजी मंत्री स्व.दिगंबरराव बागल यांच्या 68 व्या जयंतीनिमित्त 9 मार्च ते 13 मार्च 2023 या दरम्यान होणाऱ्या कृषी महोत्सव कार्याचा प्रारंभ विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या हस्ते आज (ता.२) यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात भूमिपूजन करून संपन्न झाला. याप्रसंगी राज्य सहकारी साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल उपस्थित होत्या. प्रारंभी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले, या कृषी प्रदर्शन साठी आवश्यक स्टॉल आणि मंडप उभारणी कामाची सुरुवात झाली.

यावेळी मार्केट कमिटीचे व्हा.चेअरमन चिंतामणी जगताप,आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे, प्राध्यापक कल्याणराव सरडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य एल बी पाटील, तसेच यशवंत परिवारातील प्राध्यापिका नाईक व प्राध्यापिका सौ अनिता देशमुख, या सात व्यक्तींच्या हस्ते प्रतिकात्मक रित्या पहिली कुदळ मारून विधिवत भूमिपूजन संपन्न झाले.

या भूमिपूजन समारंभाचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न मंगेश देशपांडे, व संकेत कुलकर्णी यांनी केले. प्रारंभी श्री गणेश पूजा करण्यात आली नंतर भूमिपूजन करण्यात आले. यावेळी रश्मी बागल यांनी कृषी प्रदर्शनाच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट करून कृषी प्रदर्शनामध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे विविध स्टाँल असणार आहेत. तर या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आठवणीतले मामा हे अभिनव दालन उभारले जाणार असून, यामध्ये लोकनेते स्वर्गीय मामांच्या दुर्मिळ व संस्मरणीय अशा छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. यातून जुन्या आठवणींना व त्यांनी केलेल्या विकास कामांना उजाळा मिळणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम राजकारण विरहित असून स्वर्गीय मामांनी ज्याप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन तालुक्यांमध्ये अनेक विकास कामे केली. त्यांच्या कामाप्रती ही अभिनव अशी आदरांजली असणार आहे.

या कृषी महोत्सवाच्या सोबतच महिलांसाठी माहेर मेळावा 10 मार्च रोजी आयोजित केला असून यामध्ये हळदीकुंकू व खेळ पैठणीचा कार्यक्रम तर उद्घाटन समारंभ व शहीद जवानांच्या वारसांचा सन्मान सोहळा संपन्न होईल. तसेच हलगी व लेझीम स्पर्धा 11 मार्च रोजी आयोजित केली आहे. 12 मार्च रोजी ग्रुप डान्स स्पर्धा व विविध कला महोत्सव आयोजित केला असून 13 मार्च रोजी या भव्य कृषी महोत्सवाची शानदारपणे सांगता होणार आहे, यावेळी शेखर जोगळेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

या कृषी प्रदर्शनाला यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांचे जनतेचे शेतकऱ्यांचे कार्यकर्त्यांचे हितचिंतकांचे तालुक्यातील खते व बी बियाणे विक्रेते शेती अवजारांची विक्रेते या सर्वांनी या प्रदर्शनाचे स्वागत केले, असून सहकार्य लाभत आहे. हे कृषी प्रदर्शन सर्वांनाच आदर्श ठरेल व ते भव्य स्वरूपात असेल असा विश्वास रश्मी बागल यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!