वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचा समाजरत्न पुरस्कार गणेशभाऊ करे- पाटील यांना तर निसर्गसेवा गौरव पुरस्कार शिक्षक कल्याणराव साळूंके यांना प्रदान..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने कै.कल्याणराव इंगळे यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमीत्त देण्यात येणारा समाजरत्न पुरस्कार करमाळा येथील यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेशभाऊ करे- पाटील यांना तर निसर्ग सेवा गौरव पुरस्कार कुंभेज येथील निसर्गमित्र शिक्षक कल्याणराव साळूंके यांना अक्कलकोट येथे प्रसिद्ध अभिनेते अक्षय मुदवाडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वटवृक्ष देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश इंगळे होते. कै.कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे तंत्रज्ञनिकेतन महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले यामध्ये शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेशभाऊ करे -पाटील यांची तर करमाळा तालुक्यातील दिगंबरराव बागल विद्यालयातील पक्षीमित्र उपक्रमशील शिक्षक कल्याणराव साळूंके यांनी पक्षीगणना, नैसर्गिक अधिवासातील पशूपक्षांसाठी पाणवठे तयार करणे त्यांच्या अन्नाची व्यवस्था करणे,फुलपाखरांसाठी उद्यान तयार करणे, उजनी धरण परिसरातील जैवविविधतेबाबत जागृती निर्माण करणे या सारख्या समाजोपयोगी कामाची दखल घेत त्यांची निसर्ग सेवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी पुरूषोत्तम राजिमवाले चोळ्ळापा महाराज यांचे वंशज अन्नू महाराज, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचेअमोलराजे जन्मेंजराजे भोसले डॉ सुनील फडतरे वटवृक्ष देवस्थान ट्रस्टचे भारतराव शिंदे करमाळा तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर अक्रुर शिंदे, बिभिषण कन्हेरे, सुभाष मुटके, गजेंद्र पोळ,मेजर ढेरे, मुख्याध्यापक, बाळकृष्ण लावंड, प्रशांत नाईकनवरे, गोपाळ तकीक -पाटील, बापूराव गायकवाड, सुखदेव गिलबिले, ननवरे सर, अवघडे सर, भिवा वाघमोडे, उपस्थित होते.