रनसिंग फार्म येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत स्नेहमेळावा व कवी संमेलन संपन्न - Saptahik Sandesh

रनसिंग फार्म येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत स्नेहमेळावा व कवी संमेलन संपन्न

डॉ. प्रदीप आवटे कविता सादर करताना

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : दि.१९ रोजी करमाळा तालुक्यातील खातगाव क्रमांक १ येथील रणसिंग परिवारातर्फे रनसिंग फार्मवर स्नेहमेळाव्याचे तसेच हुरडा पार्टी, शिवार फेरी व कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती.

स्नेहमेळावाच्या अध्यक्षस्थानी करमाळा येथील ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ.अ‍ॅड.बाबूराव हिरडे हे होते. यावेळी बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, करमाळा येथील यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शिवाजीराव बंडगर जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजेभोसले,पुणे मनपाचे नगरसेवक आदित्य माळवे, पुणे मनपा सदस्य संदीप काळे, पुणे भाजपा सरचिटणीस संजय पायगुडे, पुणे मनपा सदस्य मनोज पाचपुते आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी प्रकाश लावंड हे होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. प्रदीप आवटे यांनी कवी संमेलनाचे सुत्र संचालन केले.यावेळी प्रकाश लावंड, डॉ. प्रदीप आवटे, डॉ. माधुरी आवटे,खलील शेख, सोमनाथ टकले, लक्ष्मण जगदाळे, मारुती साखरे, रोहिणी वीर, विजय खंडागळे, संजय पायगुडे, सुरज हिरडे आदींनी विविध कविता,गीते सादर केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजेंद्र रणसिंग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व्ही. आर. गायकवाड यांनी अंधश्रद्धा या विषयावर आपले मनोगत व्यक्त करत हातचलाखीची काही प्रात्यक्षिके करून दाखविली. यावेळी विविध मान्यवरांची स्टेजवर भाषणे झाली. रणसिंग परिवाराने मेहनतीच्या जोरावर, कल्पकतेने व परिवाराची एकता ठेवून शेतीमध्ये जी प्रगती केली आहे त्याचे उपस्थित मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले.  त्याचबरोबर माणसामाणसांमध्ये प्रेम भाव निर्माण व्हावा, माणुसकी टिकून राहावी यासाठी अशा प्रकारचे स्नेह मेळावे, हुरडा पार्टी, कवी संमेलने आदी प्रकारचे कार्यक्रम राबविण्याची गरज असल्याचे मत विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातुन व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे आयोजन टाकळी येथील डीसीसी बँकेचे निरीक्षक राजेंद्र रणसिंग,लालासाहेब रणसिंग,जालिंदर रणसिंग या तीन बंधूंसह रणसिंग परिवाराने केले होते.या कार्यक्रमाला उपस्थितांसाठी हुरडा पार्टी व भोजनाची व्यवस्था रणसिंग परिवाराकडून करण्यात आली होती. श्री.बोडखे यांनी आपल्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक तयार केले होते. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत या लेझीम पथकाने केले.

कार्यक्रमातील एका कवितेच्या सादरी करणाचा व्हिडीओ

या कार्यक्रमाला व्याख्याते प्रा.सुहास गलांडे, राजेंद्र धांडे (माजी संचालक आदिनाथ कारखाना) किरण काका कवडे (संचालक आदिनाथ कारखाना), रामभाऊ हाके ( संचालक मकाई) व्ही आर.गायकवाड, नाथाजीराव शिंदे सोमनाथ पाटील, काळे सर, डॉ. गुळवे डॉ. गाढवे, डॉ. शेख, लतीस पाटील, कानडे (एम एस ई बी पुणे), खडके साहेब (एसबीआय पुणे) भानुदास आप्पा बाबर( सरपंच माजी उपसरपंच हिंगणी) बजरंग शिंदे (संचालक उत्पन्न बाजार समिती करमाळा), दीपक आबा देशमुख (संस्थापक अध्यक्ष लोकविकास दूध डेरी), श्री.सुपेकर, सौ. सुपेकर, श्री. झेंडे, सतीश गुळवे (चेअरमन टाकळी विकास सेवा सहकारी संस्था) ज्ञानेश्वर दोडमिसे, जितेंद्र ढवळे (उपाध्यक्ष भाजपा पुणे) आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामहरी झांजुर्णे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रणसिंग परिवारातील व्यक्तींनी व पाहुणेमंडळीनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!