अगोदरच हस्तांतरण केलेल्या जमिनी डॉक्टरांना विकून ३८ लाखाची केली फसवणूक - Saptahik Sandesh

अगोदरच हस्तांतरण केलेल्या जमिनी डॉक्टरांना विकून ३८ लाखाची केली फसवणूक

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : अगोदरच एक बक्षिसपत्र व दोन खरेदीखते दिलेली मिळकत डॉक्टरांना विक्री करून ३८ लाख ३० हजार रूपयाची फसवणूक केली आहे. हा प्रकार उंदरगाव (ता.करमाळा) येथे घडला आहे.

या प्रकरणी डॉ.विक्रम विष्णू नाळे (रा. वाशिंबे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझ्या ओळखीचे इंदुबाई नामदेव टकले व त्यांचा मुलगा महेश नामदेव टकले यांनी त्यांच्याकडील जमिनी विक्री करण्याचे सांगितले. त्यानुसार त्या जमिनीचा सौदा होऊन सदरच्या जमिनीसाठी मी त्यांना ३८ लाख ३० हजार रूपये वेळोवेळी देऊन रजिस्टर्ड खरेदीखत केलेले आहे. सदरच्या खरेदीखता नंतर सातबारा उताऱ्यावर नोंद लावताना सोनाली मोहोळकर व अंजना वाघमारे या दोघींनी हरकत घेतली.

त्यानंतर सदरची नोंद नामंजूर झाली. त्याबाबत अपीलात जात असताना आवश्यक ती कागदपत्रे काढल्यानंतर इंदुबाई टकले हिने मुलगा मंगेश टकले यास ६० आर मिळकत बक्षीसपत्राने दिलेली होती. तसेच तसेच तुकाराम शंकर कांबळे व जिजाबाई केरू ननवरे यांना मला विक्री केलेल्या जमिनी अगोदरच विक्री केलेल्या होत्या. अगोदर हस्तांतरण केलेल्या जमिनीची माहिती असूनही इंदुबाई व महेश यांनी माझ्याकडून ३८ लाख ३० हजार रूपये घेऊन त्याच मिळकती विक्री करून फसवणूक केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी या दोघांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहुरकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!