चिखलठाण येथील न्यू इरा पब्लिक स्कूल ‘दंतरोग’ तपासणी शिबिर संपन्न..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आजाराच्या, वाढत्या प्रमाणात वाढ होत असून, लहान मुले चॉकलेट किंवा बाहेर पदार्थ खाण्याचा उत्साह जास्त आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण हे चॉकलेट खाण्याचे असल्यामुळे दात खराब होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे चिखलठाण येथील न्यू इरा पब्लिक स्कूल दंतरोग शिबिर तपासणी आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराला सुरुवात करण्यापूर्वी संस्थेचे अध्यक्ष डॉ.ब्रिजेश बारकुंड यांनी दंतरोग तज्ञ डॉ.संदीप महाजन यांचे स्वागत करून सन्मान केला. त्यानंतर डॉक्टर महाजन यांनी विद्यार्थ्यांनी दाताची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. दात किडणे, सूज येणे, तोंडाचा खराब वास येणे, हिरडी सुजणे, दातामध्ये असणारा गॅप त्याची चुकीच्या पद्धतीने होणारी वाढ अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे दिली व काय उपाययोजना कराव्यात याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यानंतर नर्सरी ते सीनियर पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे दातांची तपासणी करण्यात आली. ज्यांना काही समस्या असतील त्यावर उपाययोजना सांगण्यात आल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कसबे सर, प्री प्रायमरी च्या विभाग प्रमुख रोकडे मॅडम व सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.