कामगार देतो म्हणून दोन लाख ४० हजारांची फसवणूक- पश्चिम बंगालमधील दोघांविरुद्ध गुन्हा

0

करमाळा, ता.२९: मासे पकडण्यासाठी कामगार उपलब्ध करून देतो, असे सांगून पश्चिम बंगालमधील दोघाजणांनी एका व्यक्तीची दोन लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार दि. २७ मार्च २०२६ रोजी घडला असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत भारत लक्ष्मण नगरे (रा. बोरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, मासे पकडण्यासाठी काही कामगारांची आवश्यकता असल्याने अभिजीत वसुदेव मंडळ (रा. तारकनगर,जिल्हा नदीया , पश्चिम बंगाल) तसेच सुखदास विश्वास (रा. पश्चिम बंगाल) या दोघांनी कामगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.


कामगार देण्यासाठी खर्च येईल, असे सांगून संबंधितांनी चार कामगारांच्या बदल्यात दोन लाख ४० हजार रुपये घेतले. मात्र पैसे घेतल्यानंतर त्यांनी कोणतेही कामगार उपलब्ध करून दिले नाहीत. तसेच घेतलेली रक्कमही परत न करता फिर्यादीची फसवणूक केली आहे.

याप्रकरणी संबंधित दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!