चिखलठाण येथे जुगार खेळताना चौघांना पोलीसांनी रंगेहात पकडले -

चिखलठाण येथे जुगार खेळताना चौघांना पोलीसांनी रंगेहात पकडले

0

करमाळा,ता.२९:चिखलठाण येथे जुगार खेळताना चौघेजण सापडले असून त्यांच्याकडे आठ हजार रुपये रोख व इतर साहित्य असा एक लाख ५८ हजार रुपयाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. हा प्रकार 27 मे ला दुपारी अडीच वाजता घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चेतन अशोक पवार यांनी फिर्याद दिली आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की बातमीदार मार्फत चिखलठाण येथे बंटी बाळासाहेब सरडे यांच्या शेतात काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली असता आम्ही छापा टाकला.

त्यावेळी तेथे शंकर विष्णू माने (रा.जेऊर) दादा बाजीराव सरडे व शेखर कचेर पोळ (रा. चिखलठाण नं.१ ) हे त्या ठिकाणी आढळले तसेच त्यावेळी बंटी बाळासाहेब सरडे हा पळून गेला होता असे चौघ जण जुगार खेळताना आढळून आले त्यांच्याकडून रोख रक्कम आठ हजार चारशे जप्त केले असून  तीन  बजाज प्लॅटिना जप्त करण्यात आल्या असून या चौघांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!