वाशिंबेत २७ लाखांच्या विकासकामांना प्रारंभ; दिग्विजय बागल यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण -

वाशिंबेत २७ लाखांच्या विकासकामांना प्रारंभ; दिग्विजय बागल यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण

0
वाशिंबे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करताना भाजप नेते दिग्विजय बागल व उपस्थित मान्यवर.

करमाळा(प्रतिनिधी): जिल्हा परिषद सदस्य रश्मी बागल व भाजप नेते दिग्विजय बागल यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण बुधवारी (दि. ३) वाशिंबे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. भाजप नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. विविध विकासकामांसाठी सुमारे २७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना दिग्विजय बागल म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकहिताची विकासकामे सातत्याने राबविली जात आहेत. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात असून भविष्यातही गावाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू राहतील.

गावातील मूलभूत सुविधा, धार्मिक स्थळांचा विकास, आरोग्य सेवा व पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी शासनाच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमास मकाई कारखान्याचे संचालक गणेश झोळ, बाळासाहेब पांढरे, काशीनाथ काकडे, संतोष पाटील, रेवनाथ निकत, कल्याण शिंदे, भाऊसाहेब झोळ, सोमनाथ झोळ, रणजित शिंदे, अजित झांजुर्णे, हर्षवर्धन पाटील, राजाभाऊ जगदाळे, नाना झाकणे, शैलेश झोळ, दत्तात्रय कुलकर्णी, दिलीप ढेरे, सोनवणे सर, विलास झोळ, शंकर कांबळे, अंगत झोळ, दिग्विजय पवार, जयदीप झोळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रद्धास्थान श्री भैरवनाथ मंदिराला हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न

श्रद्धास्थान असलेल्या श्री भैरवनाथ महाराज मंदिराच्या विकासासाठी आवश्यक असलेली हक्काची जमीन मिळावी यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दिग्विजय बागल यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “वाशिंबेच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही. यापूर्वी माजी आमदार शामलताई बागल यांच्या कार्यकाळात ३३/११ केव्ही वीज उपकेंद्र, श्री भैरवनाथ मंदिराला ‘क’ दर्जा, सभागृह तसेच स्वर्गीय मामांच्या प्रयत्नांतून पशुवैद्यकीय दवाखाना व समाजमंदिराची उभारणी करण्यात आली आहे. तसेच गटनेत्या रश्मी बागल यांच्या प्रयत्नातून जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबे येथे स्थलांतरित करण्यास मंजुरी मिळाली आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!