ॲड.डॉ.बाबूराव हिरडे यांना क्रांतीसुर्य सत्यशोधक समता पुरस्कार प्रदान - Saptahik Sandesh

ॲड.डॉ.बाबूराव हिरडे यांना क्रांतीसुर्य सत्यशोधक समता पुरस्कार प्रदान

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : रावगाव येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा क्रांतीसुर्य सत्यशोधक समता पुरस्कार यावर्षी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक ॲड. डॉ. बाबूराव हिरडे यांना प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावगाव ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप शेळके हे होते. यावेळी व्यासपीठावर मकाईचे संचालक गोवर्धन करगळ, माजी सरपंच विलास बरडे, बाजार समितीच्या माजी संचालक सरस्वती केकान, ग्रामपंचायत सदस्य संतोष फुंदे, दादा पवार, दूध संघाचे चेअरमन देवीदास बरडे, माजी पोलीस उपनिरीक्षक श्री. केकान, भजनी मंडळाचे अध्यक्ष दत्तू बरडे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर पवार, सुरेश फुंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या नावाचा व त्यांच्या जयंतीनिमित्ताने मिळालेला पुरस्कार हा निश्चितच प्रेरणादायी असून भविष्यात अधिक काम करण्यास ऊर्जा देणारा पुरस्कार आहे. रावगाव येथील क्रांतीसुर्य महात्मा फुले प्रतिष्ठानने हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम सुरू केला असून काम करणाऱ्या लोकांना प्रेरणा देणारा पुरस्कार आहे. या प्रतिष्ठानद्वारे यापुढे अशाच स्वरूपाची विविध कामे केली जाईल. युवकांना संघटीत करून त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने या प्रतिष्ठानद्वारे राबविलेले उपक्रम हे इतरांसाठी अनुकरणीय आहेत. – ॲड.डॉ.बाबूराव हिरडे

यावेळी सरपंच संदिप शेळके, माजी पोलीस उपनिरीक्षक श्री. केकान, माजी सरपंच विलास बरडे यांची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व नियोजन प्रशांत शिंदे यांनी केले. यावेळी समाधान भुजबळ, अशोक भुजबळ, रोहन रासकर, महेश भुजबळ, अनिकेत रासकर, भाऊसाहेब मेहेर, सनी भुजबळ, जय भुजबळ, रोहित रासकर, हनुमंत रासकर सर, संतोष फुंदे गुरूजी, शिवराज नाईकनवरे, सुरज बरडे, सुदर्शन रासकर, राहुल रासकर, शुभम रासकर, सागर रासकर, कृष्णा नाईकनवरे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. यावेळी रावगाव परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!