उमरड शाळेत मातृ-पितृ पूजन उत्साहात संपन्न
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – आषाढातील शुक्लपक्ष पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी गुरूंची व माता-पित्यांची पूजा करून त्यांना मानवंदना दिली जाते याचे औचित्य साधून आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरड या शाळेत नातेसंबंध जपण्याचे कौशल्य यामध्ये गुरुपौर्णिमा हा उपक्रम उत्साहात घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्त्री शिक्षणाची आराध्य देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कोठावळे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व कार्यक्रमाचा उद्देश श्री अनिल यादव यांनी उपस्थितांना सांगितला तसेच शाळेने आयोजित केलेल्या उपक्रमांचे कौतुक व माता पिता पूजन उपक्रमाबाबत पालक श्री अंगद पडवळे व बाळू घनवट यांनी मनोगत व्यक्त केले व गुरुपौर्णिमेच्या पालकांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर शाळेच्या मैदानात मातापित्यांची बैठक व्यवस्था करून विद्यार्थ्यांनी आपापल्या मातापित्यांचे पूजन व औक्षण केले व त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी मातापित्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता
हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक अंकुश अमृळे दिलीप भोसले बापूसाहेब भोसले मुकुंद राऊत मेघना साळुंखे छाया वाघमारे यांनी परिश्रम घेतले गुरुजनांबद्दल व आई-वडिलांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपुलकीची व स्नेहाची भावना निर्माण व्हावी यासाठी शाळेने आयोजित केलेल्या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे शिक्षण विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले व केंद्रप्रमुख अमृत सोनवणे यांनी कौतुक केले या उपक्रमासाठी बहुसंख्या माता व पालक उपस्थित होते त्या सर्वांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.
सदर प्रमाणपत्रासाठी खालील कागदपत्रे व अटी दिलेल्या आहेत –