जेऊरच्या विनोद गरड यांची महाराष्ट्र हँडबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निवड - Saptahik Sandesh

जेऊरच्या विनोद गरड यांची महाराष्ट्र हँडबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – जेऊर (ता.करमाळा) येथील विनोद गरड यांची महाराष्ट्र हँडबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. राजस्थान येथे ९ ते १३ जानेवारी दरम्यान राजस्थान येथे होणाऱ्या हँड बॉल स्पर्धेत खेळणाऱ्या महाराष्ट्र संघाला ते मार्गदर्शन करणार आहे.

या निवडी बद्दल माजी आमदार नारायण पाटील, माजी सभापती अतुल पाटील, सरपंच पृथ्वीराज पाटील, उपसरपंच नागेश झांजुर्णे, प्रा.अर्जूनराव सरक, माजी सरपंच अनिल गादिया, नूतन हँडबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संतोष नुस्ते यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!