अशा विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई करावी!

आज सकाळी फिरायला गेलो होतो, तेव्हा करमाळा शहराकडे परत येताना एक व्यक्ती नंबर नसलेल्या मोटार सायकलवरती फार मोठ्या प्रमाणात खुर्च्या घेऊन विकायला निघाला होता. मोटार सायकल वरती स्पिकर वर मोठंमोठ्याने गाणी वाजवत होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात खुर्च्या घेऊन रस्त्यावरुन गाडी चालविणे हे स्वतः सहित इतरांनाही धोकादायक प्रकार आहे. तसेच मोठ्या आवाजात गाणे लावत रस्त्यावरून जात ध्वनी प्रदूषण करणे हे देखील चुकीचे आहे. प्रत्येकाला व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य जरी असले तरी इतरांना त्रास न होता तो करावा अशी अपेक्षा आहे. करमाळा पोलिसांनी अशा व्यक्तींना समन्स द्यावा.
एक नागरिक, करमाळा
तुमच्या परिसरातील समस्या आमच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी संदेश सिटीझन रिपोर्टर वर माहिती पाठवू शकता – संदेश सिटीझन रिपोर्टर न्यूज


