करमाळ्यात हॉस्पिटलसमोरून दुचाकी चोरी

0


करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१ : शहरातील लावंड हॉस्पिटलसमोरून एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समाधान तुकाराम वाघ (वय 22, रा. वाघाचीवाडी, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मामाच्या नावावर असलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस काळ्या रंगाची व ६० हजार रुपये किंमतीची (क्र. MH 42 P 2584) ही दुचाकी ते मागील काही वर्षांपासून वापरत होते.


दि. 26 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजता त्यांनी आजारी आईला उपचारासाठी लावंड हॉस्पिटल येथे आणले. हॉस्पिटलसमोर दुचाकी हॅन्डल लॉक करून उभी केली होती. उपचारानंतर रात्री सुमारे 10 वाजता बाहेर आल्यावर दुचाकी जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोध घेतला, मात्र ती मिळाली नाही. यात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!