करमाळा नगर परिषदेने जरा याकडेही लक्ष द्यायला हवे! - Saptahik Sandesh

करमाळा नगर परिषदेने जरा याकडेही लक्ष द्यायला हवे!

तसं पाहिलं तर करमाळा शहरात मुख्य बाजारपेठे मध्ये मेन रोड वरील एकेरी वाहतुकीच्या ट्राफिक सहित अतिक्रमणाच्या ही अनेक समस्या आहेतच. परंतु हा झाला शहराचा अंतर्गत प्रश्न .पण जेव्हा आपण नगर वरून येताना करमाळा शहरात प्रवेश करतो .तेव्हा आपल्याला रस्त्याच्या कडेला प्रचंड प्रमाणात घाण- कचरा दिसतो हा फोटो करमाळा शहरात नगर कडून प्रवेश करताना अमरधाम पुढील करमाळा नगर परिषद हद्दीतील रस्त्याचा आहे.

दोन्ही बाजूला प्रचंड काटेरी झुडपे वाढलेले असून आजूबाजूला कचऱ्याचे ढिगारे पडलेले असतात. या कचऱ्यातून प्रचंड प्रमाणात धूळ व कॅरीबॅग,प्लास्टिकच्या बाटल्या, हे रस्त्याने आपल्याला पाहायला मिळते.
किंवा जवळून आपले एखाद्या मोठे वाहन गेल्यास हाच कचरा सगळा त्या वाहनाच्या हवेने मोटार सायकल वाले असतील किंवा पादचारी असतील यांच्या अंगावरती उडतो. शहरात प्रवेश करताना चा रस्ता अरुंद असून मोठ्या वाहन चालकांची तर कसरत होते.विशेषतः शहरामध्ये प्रवेश करतानाचे जे रस्ते असतील ते नगरपालिकेने स्वच्छ ठेवायला हवे. कारण या ठिकाणावरून हजारो प्रवाशांची वाहनांची येणे जाणे चालू असते.परंतु शहरात प्रवेश करतानाच अशी रस्त्याच्या बाजूला घाण दिसल्यास हे शहर तालुक्याचे ठिकाण आहे का लहान खेडे आहे हेच लक्षात येत नाही.

तरी कृपया करून नगरपालिकेने या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देऊन किमान शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवरती साफसफाई करायला हवी अशाप्रकारे नगरपालिका हद्दीत बेकायदेशीरपणे अतिक्रमण करणाऱ्यांना, घाण कचरा टाकणाऱ्यांना नगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई व्हायला हवी. यामुळे नक्कीच या परिसरात स्वच्छता राहील
आणि करमाळा शहराच्या सौंदर्यामध्ये वाढ होईल.

✍️ प्रवीण अवचर, करमाळा

तुमच्या परिसरातील समस्या आमच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी संदेश सिटीझन रिपोर्टर वर माहिती पाठवू शकता – संदेश सिटीझन रिपोर्टर न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!