सिद्धार्थनगर भागातील गटारी तुंबल्या – नगरपालिकेने दखल घ्यावी
समस्या : करमाळा शहरातील सिद्धार्थनगर भागात गटारी साफ करण्यासाठी करमाळा नगरपालिकेचे कर्मचारी गेल्या अनेक दिवसां पासून आले नसल्याने गटारी कचऱ्याने तुंबलेल्या आहेत. तसेच परिसर देखील अस्वच्छ बनलेला आहे. संबंधित फोटो खाली दिले आहेत. अशातच काल झालेल्या पावसाने ह्या गटारीत पाणी जाऊन गटारी तुंबलेल्या आहेत. पावसाच्या पाण्याने हा कचरा, गाळ वाहून अगदी लोकांच्या घरात शिरला आहे. नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडे तक्रार दिली असून अनेक वेळा पाठपुरावा केला आहे, तरी कुणीही दखल घेत नाही. करमाळा नगरपालिकेच्या अधिकारी वर्गाने याकडे लक्ष द्यावे ही अपेक्षा आहे. याचबरोबर नागरिकांनीही घरातला कचरा गटारीत न टाकता कचऱ्याच्या डब्यात टाकून तो घंटागाडीला द्यावा. जेणेकरून गटारी तुंबणार नाहीत. नगरपालिका व नागरिक दोघांनी जबाबदारी घेतली तर सिद्धार्थनगर मध्ये स्वच्छता राहण्यास सुरुवात होऊ शकते.
समस्या मांडणारे – अभिजीत लोंढे, सिद्धार्थ नगर, करमाळा
संबंधीत फोटो खाली दिले आहेत –
आपल्या भागातील समस्यांवर आवाज उठविण्यासाठी इथे माहिती नोंदवा –https://saptahik-sandesh.com/sandesh-citizen-reporter-page/