अपघात टाळण्यासाठी कुंभेज फाट्यावर गतिरोधक बसवावा
समस्या – कुंभेज फाटा ते जिंती मार्गे भिगवणला जोडला गेलेल्या मार्गाचे नूतनीकरण ठराविक ठिकाणे वगळता काम पुर्ण होण्याच्या टप्यात आहे. या मार्गांवर वाहतूक देखील वाढू लागली आहे. त्यामुळे कुंभेज फाटा येथे टेम्भूर्णी नगर हा महामार्गाचा मोठा चौक तयार झाला आहे. त्याचं प्रमाणे कुंभेज फाटा येथे बाजारपेठ देखील वाढू लागली आहे. शाळा कॉलेजचे विदयार्थी,औद्योगिक कारखान्यातील कामगार तसेच वाढत्या हॉटेल व्यवसाय व इतर दैनंदिन गरजेच्या दुकानदारीमुळे नेहमी वर्दळ दिसते.
टेम्भूर्णी-नगर रोड हा उत्तर भारत ते दक्षिण भारत जोडणारा जड वाहतुकीची साठी ओळखला जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे त्यामुळे कुंभेज चौकात अनेकवेळा छोटे मोठे अपघात होतात. काहींना जीव देखील गमवावा लागला आहे हे अपघात टाळण्यासाठी काही प्रमाणात फरक पडावा यासाठी कुंभेज फाटा येथील व्यापारी वर्ग व विध्यार्थी यांच्याकडून गती रोधक बसवण्याची मागणी होत आहे.
यांनी दखल घ्यावी – सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते महामंडळ
समस्या मांडणारे – संतोष भगवान कांबळे, कुंभेज फाटा
आपल्या परिसरातील समस्या इथे मांडा – संदेश सिटीझन रिपोर्टर न्यूज