सालसे येथील यमाई मंदिराला जाण्यासाठी पक्का रस्ता करावा - Saptahik Sandesh

सालसे येथील यमाई मंदिराला जाण्यासाठी पक्का रस्ता करावा

समस्या — सालसे (ता.करमाळा) येथील सालसे-हिवरे मार्गावर यमाई मातेचे मंदिर आहे. या मंदिराला दर मंगळवारी, शुक्रवारी तसेच पौर्णिमेला सुमारे 500 भाविक परिसरातून व परराज्यातून दर्शनासाठी येत असतात. यमाई माता मंदिराकडे जाणारा रस्ता अतिशय खराब असल्याकारणाने भाविकांना मंदिराला जाण्या येण्यास अडचणी निर्माण होतात.

नुकत्याच या मंदिराला पुणे येथील मारवाडी व्यापाऱ्याने सुमारे एक करोडची देणगी देऊन मंदिराचा जिर्णोद्धार केलेला आहे. अशा परिस्थितीत रस्ता जर चांगला असेल तर तर भाविकांना मंदिराला येण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही.

या मंदिरामुळे सालसे गावची एक वेगळी ओळख आहे. परंतु खराब रस्त्यामुळे सालसे गावची दुसरी पडकी बाजू समोर येते. मी आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप यांना देखील निवेदन दिलेले आहे. तरी शासनामार्फत हा पक्का रस्ता लवकरात लवकर करावा अशी मागणी मी सालसे ग्रामस्थांच्यावतीने करतो.

समस्या मांडणारे अभिमन्यू सालगुडे सालसे (ता.करमाळा) , सध्या मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!