करमाळ्यातील दोघांचा कर्जत येथे अपघात – अपघातात दोघांचा मृत्यू…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : कर्जत शहरातील कर्जत-करमाळा मार्गावर सटवाई फाट्याजवळ आज बुधवारी (ता.२६) दुपारी झालेल्या अपघातात करमाळा येथील श्रीदेवीचामाळ येथे राहणाऱ्या दोघांचा मृत्यू झालाआहे. दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. यामध्ये गणेश पांडुरंग बेद्रे, (वय-२८) व शिवम सचिन चांदगुडे, (वय-१८) दोघेही रा.देवीचामाळ करमाळा अशी मयत झालेल्या दोघांची नावे आहेत.
दोघेही कर्जतहून करमाळ्याकडे जात होते. दरम्यान कारने जोरदार धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून दोघांनाही कर्जत येथे रुग्णालयात नेण्यात आले. परंतु शिवम सचिन चांदगुडे या युवकाचा जागीच मृत्यू झालेला होता तर गणेश बेद्रे याला कर्जत येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र गंभीर दुखापत झाल्याने त्याचाही मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कर्जत येथील पोलीस निरीक्षक मारुती मुळूक व सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी अपघातस्थळी भेट दिली.


