करमाळा शहरात ऑनलाइन जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई १३२५० रुपयेचा ऐवज जप्त

करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२८: करमाळा शहरातील फंडगल्ली परिसरात सुरू असलेल्या कथित ऑनलाइन जुगार अड्ड्यावर करमाळा पोलिसांनी छापा टाकून एका युवकास ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम व इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकूण १३ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २५ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास करमाळा शहरातील फंडगल्ली परिसरात एका दुकानाच्या वरच्या मजल्यावर श्रीओम दत्तात्रय झोळे हा भिंगो ऑनलाइन चक्री जुगार चालवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला.

यावेळी एका मोबाईल अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन जुगार खेळवला जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संशयिताकडून १००, ५० रुपयांच्या नोटा, रोख रक्कम तसेच मोबाईल व टीव्ही स्क्रीनसह इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले. जप्त साहित्यामध्ये मोबाईल फोन, टीव्ही स्क्रीन आणि इतर उपकरणांचा समावेश आहे.
या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करमाळा पोलिस करत आहेत.
जप्त मुद्देमाल
▪️ रोख रक्कम – ₹750
▪️ मोबाईल – ₹5000
▪️ टीव्ही स्क्रीन – ₹7000
▪️ रिमोट – ₹500
एकूण किंमत – ₹13,250

