स्मशानभूमीत सुरू होता जुगार- करमाळा पोलिसांची धाड-आठ जण ताब्यात..

0


करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२१: पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कोंढारचिंचोली येथील स्मशानभूमी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून आठ जणांवर कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० मे २०२६ रोजी करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकाला कोंढारचिंचोली येथील स्मशानभूमी परिसरात काही इसम ५२ पत्त्यांच्या डावावर जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. यावेळी काही इसम वर्तुळाकार बसून पत्त्यांवर जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळी आठ जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये विजय पोपट गलांडे (वय ५९), दशरथ धोंडीबा कांबळे (वय ७०), सोमनाथ खांडकर (वय ४४), सुशांत तुकाराम धोंडे (वय ३१), आकाश अनिल कांबळे (वय २१), निखिल बाळू कांबळे (वय ४०), किरण सोपान डफळे (वय ६२) व विठ्ठल लक्ष्मण गलांडे (वय ६०, सर्व रा. कोंडारचिंचोली, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी १,२६० रुपयांची रोख रक्कम, ५२ पत्त्यांचा एक डाव, निळ्या रंगाचा शाईचा बॉलपेन व आकडे लिहिलेला कागद असा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!