जेऊर येथील १७ वर्षाच्या मुलीस पळविले - Saptahik Sandesh

जेऊर येथील १७ वर्षाच्या मुलीस पळविले

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : जेऊर (ता. करमाळा) येथील १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने पळवून नेले आहे. हा प्रकार ९ मे ला सकाळी साडेदहा वाजता घडला आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी करमाळा पोलीसात फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझी १७ वर्षे वयाची मुलगी ९ मे २०२४ रोजी सकाळी साडेदहा वाजता घरात कोणास काही न सांगता निघून गेली आहे. तिला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहुरकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!