मालट्रकने मोटरसायकलला धडक दिलेल्या अपघातातील महिलेचा मृत्यू..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.12) : मालट्रकने मोटरसायकलला धडक देऊन झालेल्या अपघातातील महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात काल (ता.11) सकाळी 11 वाजता करमाळा – नगर रस्त्यावर कामोणे फाट्यावर झाला होता. मरण पावलेली युवती आठ महिन्याची गरोदर होती. मृत नाव सोनाली पंकज कांबळे (वय १९) भीम नगर ता. करमाळा असे आहे. या महिलेचा पती पंकज कांबळे हे या अपघातात जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सोनाली ही आपल्या माहेरी गेली होती. तिचे पती पंकज हे तिला मोटरसायकलवरुन (क्रमांक एम एच १६ डीएफ १८५०) करमाळ्याकडे येत होते. सकाळी ११ च्या सुमारास ते अहमदनगर करमाळा मार्गावर कामोने फाटा येथे आले असता, पाठीमागून येत असलेल्या माल ट्रक क्र.(टी.एन.५२.एम.३४६९) च्या चालकाने ‘मोटरसायकल’ला पाठीमागून धडक दिली. यावेळी मोटरसायकल रस्त्याच्या खाली जाऊन पडली. त्यात सोनाली गंभीर जखमी झाली. त्यानंतर उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला आहे. यामध्ये करमाळा पोलिसांनी मालट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



