उत्तरेश्वर विद्यालयात शिक्षकांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न - Saptahik Sandesh

उत्तरेश्वर विद्यालयात शिक्षकांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न

केम (संजय जाधव) शनिवार दि. १३ एप्रिल रोजी श्री उत्तरेश्वर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री पी.डी कोंडलकर, श्री डी.एन तळेकर, ज्येष्ठ सेविका‌ वृषाली पवार यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला.

सुरूवातीला शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन सेवापूर्ती समारंभाचे प्रमुख पाहुणे श्री प्राचार्य डॉ प्रकाश कांबळे संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे अध्यापक विदयालय धाराशिव, मराठवाडा विद्या समितीचे सचिव श्री एस एच वागदकर यांनी केले. शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण कुर्मदास विद्यामंदिरचे मुख्याध्यापक बी.एस तळेकर यांनी केला. दिपप्रज्वलन सेवापूर्ती समारंभाचे अध्यक्ष मा.दिलीपदादा तळेकर,सौ सारीका कोरे सरपंच केम, राहुल आबा कोरे, प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ प्रकाश कांबळे,श्री एस.एच वागदकर यांनी केले.

सेवापूर्ती समारंभातील उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कदम एस.बी, पर्यवेक्षक श्री गिते सर, श्री सांगवे यांनी केला. सेवापूर्ती गौरव समारंभाचे प्रास्ताविक प्रशालाचे मुख्याध्यापक श्री कदम एस.बी सर यांनी केले. विद्यार्थी मनोगता‌ मध्ये प्रज्ञा भिस्ते या विद्यार्थिनीने आणि शिक्षक मनोगत मध्ये श्री पोतदार यांनी‌ श्री कोंडलकर, श्री डी.एन तळेकर, सेविका वृषाली पवार यांच्या कार्याचा गुणगौरव केला. श्री पी.डी‌ कोंडलकर, श्री डी.एन तळेकर, सेविका श्रीमती वृषाली पवार यांचा सेवापूर्ती गौरव सत्कार प्रशालाचे मुख्याध्यापक श्री एस.बी कदम, सेवापूर्ती गौरव समारंभाचे अध्यक्ष श्री दिलीपदादा तळेकर प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ प्रकाश कांबळे, मराठवाडा विद्यासमिती सचिव एस.एच वागदकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर, उपाध्यक्ष श्री गणेश तळेकर,सौ पल्लवी सचिन रणशृंगारे, ज्येष्ठ पत्रकार राहुल रामदासी, सौ सलमा झारेकरी,दोंड मॅडम शालेय व्यवस्थापन समितीमधील सर्व सदस्यांनी केला.

विद्यार्थी हेच आमचे दैवत आहेत सेवानिवृत्त झालो तरी शाळेला गरज पडल्यास वाटेल ती मदत करू असे मनोगत सत्कारमूर्ती श्री पी.डी कोंडलकर,श्री डी.एन तळेकर, सेविका ‌वृषाली पवार यांनी व्यक्त केले.

श्रीकांत दरगुडे ‌यांनी सत्कार मूर्तींविषयी विचार व्यक्त करून सर्वांची मने जिंकली. सेवानिवृत्तीनंतर पुढील जीवन सुख-समृद्धीचे जावो असे विचार प्रमुख पाहुणे डॉ प्रकाश कांबळे यांनी व्यक्त केले. केम,मलवडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मलवडी सरपंच कल्याण सातव, सत्कारमूर्तीचे नातेवाईक, केम परिसरातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्राध्यपक अमोल तळेकर तसेच प्रतिष्ठित नागरिक यांनीही श्री पी.डी कोंडलकर, श्री डी एन तळेकर, सेविका ‌वृषाली पवार यांचा सेवापूर्ती गौरव सत्कार केला.पी.डी कोंडलकर सर यांचे नातेवाईक डी.एन तळेकर सर यांचे नातेवाईक आणि सेविका ‌वृषाली पवार यांचे नातेवाईक ,स्टाफ मेंबर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन श्री के.एन वाघमारे यांनी केले आभार डॉ संतोष साळुंखे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!