मांगी येथील प्राथमिक शाळेत डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.. - Saptahik Sandesh

मांगी येथील प्राथमिक शाळेत डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : मांगी (ता.करमाळा) येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत डॉ बाबासाहेबआंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमाने संपन्न झाली कार्यक्रमास शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश बागल तर प्रमुख पाहूणे म्हणून प्रा.अवचर सर, संतोष बनसोडे हे होते.

याप्रसंगी मान्यवरांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष पोतदार यांनी प्रास्तावीक केले, इयत्ता तिसरी राजवर्धन बनसोडे चौथी यशवर्धन बनसोडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले, प्रा.अवचर यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप केले, यावेळी हिरामण कौले वैशाली पवार सुवर्णो महामुनी आशा देमुंडे , शाम माने रंगनाथ देशमाने उपस्थित होते .आभार हिरामण कौले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!