लग्न करून देत नसल्याने चक्क मुलीला पळविले.. - Saptahik Sandesh

लग्न करून देत नसल्याने चक्क मुलीला पळविले..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : लग्न करू देत नसल्याने १७ वर्षाच्या मुलीला पळवून नेले. हा प्रकार ६ एप्रिलला सायंकाली चक्क पावणेपाच वाजता वांगी नं. २ येथे घडला आहे. यात मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझी मोठी मुलगी सामनगाव (ता. भूम) येथील सोपान सुरेश पाटमास यास दिली आहे.

माझी लहान मुलगी १७ वर्षाची असून माझा जावई त्याच्या दुसऱ्या भावासाठी मागत होते. परंतु तिचे वय लहान असल्याने आम्ही ती १८ वर्षाची झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे सांगितले.

परंतु त्यांनी ता. ६ एप्रिल २०२४ रोजी माझ्या १७ वर्षाच्या मुलीस स्वीफ्ट गाडीत बसवून जबरदस्तीने पळवून नेले आहे. यात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोपट टिळेकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!