खातगाव नं.2 येथील प्राथमिक शाळेत आंबेडकर जयंती उत्साहात – निबंध स्पर्धेत स्वराज तर चित्रकला स्पर्धेत स्नेहल प्रथम..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं.2 शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. खातगावच्या सरपंच सुवर्णा अविनाश मोरे तसेच शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष संतोष झेंडे, गावातील आजी माजी पदाधिकारी आणि ग्रामपंचायत व शाळा स्थापन समितीचे सदस्य, त्याचप्रमाणे महिलावर्ग या सर्वांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक प्रेरणादायी विचार’ या विषयावर अनमोल असे मार्गदर्शन केले. शिक्षणाच्या बळावर माणूस कशी शैक्षणिक आणि सामाजिक क्रांती करू शकतो याबाबतही अनमोल असे मार्गदर्शन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय बोलक्या शब्दात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव समितीच्या वतीने शाळेमध्ये निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
निबंध स्पर्धेमध्ये विजेते विद्यार्थी :
1)स्वराज बाळासाहेब बोडखे प्रथम क्रमांक 2) संस्कार सागर किर्ते द्वितीय क्रमांक 3) त्रिवेणी शंकर रणसिंग तृतीय क्रमांक तर
चित्रकला स्पर्धेमध्ये विजेते विद्यार्थी :
1) स्नेहल शंकर रणसिंग प्रथम क्रमांक
2)श्रद्धा हरिदास धायगुडे द्वितीय क्रमांक
3)सानिका नागनाथ गुळवे तृतीय क्रमांक
या विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे जन्मोत्सव समितीच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही आणि पेनचे वाटप करण्यात आले.तसेच या जन्मोत्सव समितीतर्फे खाऊ वाटपही करण्यात आले.
शाळेतील उपशिक्षक किरण जोगदंड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर बाळासाहेब बोडखे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. असे विविध कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुकूल असे वातावरण निर्माण करत असल्याबद्दल करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, शि. वि. अ.सुग्रीव नीळ, जयवंत नलावडे, केंद्रप्रमुख महावीर गोरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे आणि उपशिक्षक किरण जोगदंड यांचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमासाठी गावातील मान्यवर, विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.