छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पालखीतून मिरवणूक मराठा फोर्टस् दुर्गभ्रमंती व दुर्गसंवर्धनाचा उपक्रम - Saptahik Sandesh

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पालखीतून मिरवणूक मराठा फोर्टस् दुर्गभ्रमंती व दुर्गसंवर्धनाचा उपक्रम

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : येथील मराठा फोर्टस् दुर्गभ्रमंती व दुर्गसंवर्धनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पालखीतून मिरवणुक काढण्यात आली. ही मिरवणूक भवानीनाका ते खोलेश्वर मंदिरा पर्यंत काढण्यात आली.

या मिरवणुकीत आघाडीला लेझीम पथक, हलगी पथक, घोडे, दांडपट्टा व तलवारबाजीचे प्रदर्शन होते. अत्यंत उत्साहाने निघालेल्या या मिरवणुकीस ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद होता. तसेच युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. खोलेश्वर मंदिराच्या तेथे छत्रपती शिवराय तसेच अन्य देवदैवतांच्या आरती घेऊन मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी अनेक युवक व नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!