मुलांवर स्वतःची स्वप्ने लादू नका- द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड -

मुलांवर स्वतःची स्वप्ने लादू नका- द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड

0


करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२: “मुलांच्या भवितव्याचा निर्णय घेताना पालकांनी स्वतःची मते किंवा अपेक्षा त्यांच्यावर लादू नयेत. प्रत्येक मुलाची आवड, क्षमता आणि कष्ट करण्याची तयारी ओळखून त्याला त्या क्षेत्रात प्रोत्साहन दिल्यास तो निश्चितच यशस्वी होऊ शकतो,” असे आवाहन द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केले.

चिखलठाण ग्रामस्थ व न्यू इरा पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृतज्ञता व जाहीर नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. भारतीय क्रिकेट संघातील रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर आणि सिद्धेश लाड यांच्यासह अनेक नामांकित खेळाडू घडविणारे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी चिखलठाण येथील अवघ्या दहा वर्षीय वनराज पोळ याच्यासह देशभरातील ३० विद्यार्थ्यांना स्वतःकडे ठेवून मोफत पूर्णवेळ क्रिकेट प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच धनश्री गलांडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश (भाऊ) करे-पाटील, अशिष राजपूत, नवनाथ भानवसे आणि विनय सोपटे उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिनेश लाड म्हणाले, “आयपीएल स्पर्धेनंतर अनेक पालक मुलांनी क्रिकेटमध्येच करिअर करावे, असा आग्रह धरतात. मात्र केवळ आकर्षणापोटी नव्हे, तर मुलाची खरी आवड, गुणवत्ता आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी लक्षात घेऊनच त्याला योग्य दिशा दिली पाहिजे. योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ग्रामीण भागातील मुलेही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात.”

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच धनश्री गलांडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश (भाऊ) करे-पाटील, अशिष राजपूत, नवनाथ भानवसे आणि विनय सोपटे उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिनेश लाड म्हणाले, “आयपीएल स्पर्धेनंतर अनेक पालक मुलांनी क्रिकेटमध्येच करिअर करावे, असा आग्रह धरतात. मात्र केवळ आकर्षणापोटी नव्हे, तर मुलाची खरी आवड, गुणवत्ता आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी लक्षात घेऊनच त्याला योग्य दिशा दिली पाहिजे. योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ग्रामीण भागातील मुलेही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात.”


या प्रसंगी महाराष्ट्र मुलींच्या क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल श्रावणी राऊळ हिचा दिनेश लाड यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ब्रिजेश बारकुंड यांनी केले. सुधीर पोळ, बालाजी पोळ आणि विद्या बारकुंड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश करे-पाटील यांनी “कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शक लाभणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे,” असे सांगितले.

यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय सरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत सरडे आणि राजेंद्रकुमार बारकुंड यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास दिनकर सरडे, नवनाथ भानवसे, विनय सोपटे, किरण डोके, विरेन कुलकर्णी, नितीन तकीक, विश्वजीत तारू, गजेंद्र पोळ, प्रफुल्ल दामोदरे, विशाल परदेशी, विलास झोळ, मुख्याध्यापक आनंद कसबे यांच्यासह ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत खाडे यांनी केले, तर प्रमोद हरळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!