रावगाव येथे जमिनीच्या वहिवाटीवरुन हाणामारी-१२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल..

0


करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२५ : रावगाव (ता. करमाळा) येथे गट क्रमांक २५५ मधील शेतजमिनीच्या वहीवाटीवरुन १२ जणांनी सहाजणांना मारहाण केली. ही घटना २० जून २०२६ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.या प्रकरणात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ज्ञानेश्वर दिनकर ढाकणे (वय ४६, रा. रावगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले, की मी व आमच्या कुटुंबातील सदस्य शेतात २० जुन २०२६ रोजी ट्रॅक्टर घेऊन शेतात मशागत करण्यासाठी गेले होतो. दुपारी ४-३० वाजता विश्वास निवृत्ती केकाण, सुदर्शन विश्वास केकाण, शुभम वसंत केकाण, वैभव विश्वास केकाण, प्रविण अरुण केकाण, गणेश विष्णू केकाण, विष्णू निवृत्ती केकाण, प्रविण अरुण केकाण, लक्ष्मी अशोक केकाण , जया विश्वास केकाण, आदीजण आले व म्हणाले, की तहसीलदार यांनी तुमचा अर्ज फेटाळला आहे. तुम्ही शेतात यायचे नाही, असे म्हणून या सर्वांनी मशागत करण्यास विरोध केला व आम्हास मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यांनी काठ्या, दांडके व हाताने मारहाण केली. तसेच शेतात पुन्हा आल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत फिर्यादी ज्ञानेश्वर ढाकणे यांच्यासह महादेव उत्तम ढाकणे, कल्याण उत्तम ढाकणे, उर्मिला श्रीमंत ढाकणे, प्रमीला श्रीमंत ढाकणे व अरुणा मधुकर ढाकणे हे जखमी झाले. जखमींवर करमाळा व सोलापूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत फिर्यादीच्या बरगडी व नाकाच्या हाड फ्रॅक्चर झाले आहे. सदर जमीन वादाबाबत महसूल विभाग व न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना या लोकांनी शेतात येऊन मारहाण केली आसल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. यात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!