राजन पिंपळे व त्यांचे सहकाऱ्यांचे जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे भव्य चित्र प्रदर्शन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : अंबीजळगाव (ता. कर्जत) येथील रहिवाशी व पुणे येथे स्थायिक असलेले राजन दत्तात्रय पिंपळे व त्यांचे सहकारी चेतन भोसले, ज्योती आढाव, प्रा. आबा सायकर, कनिष्का थोपटे, प्रा. तुषार जाधव या चित्रकारांचे चित्राचे प्रदर्शन २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.
या चित्र प्रदर्शनामध्ये मॉडर्न आर्ट, कंटेम्पररी आर्ट, कंपोझिशन, पॉइंटिलिझम अशा विविध कलाकृती पहावयास मिळणार आहेत. जहांगीर गॅलरीतील प्रदर्शन हे कलेच्या प्रवासातील प्रत्येक कलाकारांसाठी अभिमानास्पद आहे. तरी या चित्र प्रदर्शनास कलाप्रेमींनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.