केडगाव येथील युवकाचे अपघातात निधन.. - Saptahik Sandesh

केडगाव येथील युवकाचे अपघातात निधन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : केडगाव (ता.करमाळा) येथील अरबाज महमद पठाण (वय-26) हा अपघातात जखमी होवून त्याचे उपचारापूर्वी निधन झाले आहे, हा अपघात आज (ता.15) सकाळी झाला होता. याबाबत करमाळा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत करमाळा पोलिसांना येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.भोसले यांनी माहिती दिली त्यात त्यांनी सांगितले कि, केडगाव (ता.करमाळा) येथील अरबाज महमद पठाण (वय-26) हा अपघातात जखमी झाला होता, त्याला उपचारासाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्याचे उपचारापूर्वी निधन झाले होते. याबाबत करमाळा पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!