करमाळा येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त प्रबोधन कार्यक्रम संपन्न - Saptahik Sandesh

करमाळा येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त प्रबोधन कार्यक्रम संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गणेश नगर करमाळा येथे समाज प्रबोधनाचा कार्यक्रम पार पाडला. संभाजी ब्रिगेड आणि छावा प्रतिष्ठान करमाळा यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता . छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

प्रथम प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी प्रास्ताविक केले लक्ष्मण लष्कर गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले यानंतर टीव्ही फेम गोविंद महाराज गायकवाड यांनी भारुड च्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवत हसवत अनेक सामाजिक समस्यांचा उल्लेख केला त्यामध्ये पर्यावरण वृक्ष लागवड, शिक्षणाचे महत्व, सुसंस्कार, व्यसनमुक्ती आजच्या तरुण तरुणींची जबाबदारी वगैरे विषयांना भारूडकार गोविंद महाराज यांनी हात घातला मोबाईलच्या अतिवापराने तरुणाई भरकटत चालली आहे , तेव्हा त्यांच्या हातात मोबाईल ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र द्या. यातून उद्याचा भारत नक्कीच उज्वल असेल असेही गोविंद महाराज म्हणाले.

विनोदातून समाज प्रबोधन हा असा कार्यक्रम करमाळ्यात पहिल्यांदा असल्यामुळे प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला यात महिलांची उपस्थिती जास्तच होती. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संभाजी ब्रिगेड करमाळा शहराध्यक्ष शिवश्री वैभव (नाना)माने आणि छावा प्रतिष्ठान अध्यक्ष शिवश्री योगेश (भैया) गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश नगर येथील नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले शेवटी श्रीमती माया भागवत मॅडम यांनी आभार मानून हा कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!