वादळी वाऱ्याने टाकळी-भिगवण रस्त्यावर आली काटेरी झुडपे – वाहन चालकांची कसरत सुरू
करमाळा (संदेश प्रतिनिधी) -वादळी वाऱ्याने झालेल्या पावसात टाकळी ते भिगवण रस्त्यावर रस्त्याच्या कडेला असलेली काटेरी झुडपे, उन्मळून रस्त्यावर पडलेली आहेत. पाच दिवस उलटुन देखील ही झाडे तशीच रस्त्यावर पडलेली असल्याने येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना वाहने रस्त्याच्या खालून चालवावी लागत आहेत. तसेच रात्री च्या वेळेला ही झाडे दिसली नाही तर दुचाकी प्रवाशांना ईजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन ही काटेरी झुडपे बाजूला करावी अशी मागणी केतुर ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शहाजी बापू पाटील यांनी केली आहे.