गोव्यात डिजिटल मीडिया पत्रकारांचा महासंगम-तिसरे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न

0
मा.दिनेश मडके
(ज्येष्ठ पत्रकार व तालुकाध्यक्ष डिजीटल मिडीया पत्रकार संघ,करमाळा.)

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.६: अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन गोव्यातील ‘कलाअकादमी’ येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडले. देशभरातील डिजिटल मीडिया पत्रकार, संपादक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने या अधिवेशनात सहभागी झाले होते. या अधिवेशनात पत्रकारांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेण्यात आले असून त्याचा निश्चितच डिजिटल मीडिया क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याची माहिती संघटनेचे तालुका अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दिनेश मडके यांनी दिली.

या अधिवेशनाचे उद् घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष पळदेसाई, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार सदानंद तानवडे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील, राष्ट्रीय सचिव तेजस राऊत, समन्वयक मुरलीधर चव्हाण, प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, महासचिव विकास भोसले, स्मरणिका संपादक भाऊसाहेब फास्के यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते.
या अधिवेशनात उद्योगमंत्री उदय सामंत यांची विशेष मुलाखत राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी घेतली.

यावेळी विविध ज्वलंत प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात डिजिटल मीडिया पत्रकारांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण आश्वासने दिली. “पत्रकारांसाठी असलेल्या पेन्शन योजना, आरोग्य सुविधा आणि कुटुंबीयांसाठी वैद्यकीय योजना या डिजिटल मीडिया पत्रकारांनाही लागू करण्यासाठी प्रयत्न करू,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डिजिटल भारताचे शिल्पकार असून, त्यांच्या माध्यमातून डिजिटल पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
करमाळा तालुक्यातून जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, तालुका सचिव नरेंद्रसिंह ठाकूर, उपाध्यक्ष संजय साखरे, सुर्यकांत होनप ,सहसचिव तुषार जाधव, तसेच सदस्य आनंद माळी, अंगद देवकते,रविंद्र विघ्ने,अमोल भोसले यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या अधिवेशनामुळे डिजिटल मीडिया क्षेत्रात नवा उत्साह निर्माण झाला असून अधिक संघटित आणि प्रभावीपणे काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. तालुका अध्यक्ष दिनेश मडके यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील डिजिटल मीडिया अधिक गतिमान होणार असल्याचा विश्वास नरेंद्रसिंह ठाकूर यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!