गौरव भस्मे यांची एमपीएससीतून महसूल सहाय्यक पदावर निवड

0

करमाळा(दि.५): मिरगव्हाण (ता.करमाळा) येथील गौरव दत्तात्रय भस्मे यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून महसूल सहाय्यक पदावर निवड झाली आहे.

जिद्द, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर गौरव भस्मे यांनी हे यश संपादन केले. कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय भस्मे यांचे ते सुपुत्र आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल प्रा. सुदाम कुंडलिक नाळे, डॉ. तुषार नाळे तसेच कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी अभिनंदन करून त्यांचा सन्मान केला. परिसरातूनही त्यांच्या यशाचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!