जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत जि. प.गोयेगाव शाळेचे सुयश

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा गोयेगाव(केंद्र-केत्तुर) या शाळेच्या मुलांच्या व मुलींच्या दोन्ही संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकून सुयश मिळविलेले आहे.
दि.२८/१२/२०२३ रोजी दत्त प्रशाला,मोहोळ येथे मुलांच्या स्पर्धा झाल्या. यामध्ये संघाने अजिंक्यपद पटकाविले.
तसेच दि.३०/१२/२०२३ रोजी आदर्श पब्लिक स्कुल कुर्डुवाडी येथे मुलींच्या खो-खो स्पर्धा झाल्या.यामध्येही जि.प.प्रा.शाळा गोयेगाव शाळेतील संघाने अजिंक्यपद पटकावले.

55 पट असलेल्या छोट्या शाळेने जिल्ह्यातील दोन्ही अजिंक्यपद मिळविल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे कौतुक करण्यात येत आहे.
याबद्दल करमाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व एक उत्कृष्ट कबड्डी खेळाडू असलेले मा.श्री.राजकुमार पाटील साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.जयवंत नलवडे साहेब,मा.श्री.सुग्रीव नीळ साहेब,केत्तुर केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.विकास काळे,गोयेगाव चे सरपंच सौ.उज्जवला माळशिकारे,ग्रामपंचायत सदस्य,शा.व्य.समिती अध्यक्ष श्री.विनय माळशिकारे ,शा.व्य.समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ यांनी सर्व खेळाडू ,मार्गदर्शक शिक्षक श्री .गिरी सर,येडे सर ,तोरमल सर,कदम सर प्रमोद सोनवणे, हरिदास वायसे ,पालक यांचे अभिनंदन केले.



