करमाळा विधानसभा मतदारसंघात कुर्डूमध्ये सर्वात कमी १ % तर ढोकरीत सर्वात जास्त ८३ % मतदान - Saptahik Sandesh

करमाळा विधानसभा मतदारसंघात कुर्डूमध्ये सर्वात कमी १ % तर ढोकरीत सर्वात जास्त ८३ % मतदान

करमाळा (संदेश प्रतिनिधी) करमाळा विधानसभा मतदारसंघात करमाळा तालुक्यातील ११८ गावांसह माढा तालुक्यातील ३६ गावांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण ३४२ मतदान केंद्र आहेत. ७ मे ला झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी करमाळा विधानसभा मतदारसंघातील कुर्डू (ता. माढा )येथे सर्वात कमी म्हणजेच एक (1%) टक्का मतदान झाले आहे तर करमाळा तालुक्यातील ढोकरी येथे ८३ टक्के मतदान झालेले आहे. करमाळा शहरात ५५% मतदान झाले आहे.

Related Newsमाढा लोकसभा मतदारसंघात फलटणमध्ये सर्वात जास्त तर करमाळ्यात सर्वात कमी मतदान

करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख ६६ हजार ८०३ पुरुष मतदार असून १ लाख ५१ हजार ११४ महिला मतदार आहेत तर ११ इतर मतदार आहेत. यापैकी १ लाख ३४४  (६०.१६%) पुरुष मतदारांनी  मतदान केले असून ७७ हजार १६८ (५१.०७%) महिला मतदारांनी तर इतर ४ जणांनी मतदान केले. असे एकूण १ लाख ७७ हजार ५१६ एवढे मतदान करमाळा विधानसभा मतदारसंघात झाले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात झालेले एकूण मतदान
गावनिहाय मतदानाची टक्केवारी

Related Newsमाढा लोकसभा मतदारसंघात फलटणमध्ये सर्वात जास्त तर करमाळ्यात सर्वात कमी मतदान

संपादन – सुरज हिरडे

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!