करमाळा शहराला होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेची माजी नगरसेवक संजय सावंत यांचेकडून दहिगाव येथे पाहणी - Saptahik Sandesh

करमाळा शहराला होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेची माजी नगरसेवक संजय सावंत यांचेकडून दहिगाव येथे पाहणी

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहराचा पाणीपुरवठा गेल्या अनेक दिवसापासून विस्कळीत झाला असून, शहरातील नागरिकांना पाण्यामुळे खूप हाल सहन करावे लागत आहेत, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, दहिगाव वरुन होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेत काही ना काही अडचणी निर्माण होत आहेत, याच अडचणी जाणुन घेण्यासाठी माजी नगरसेवक संजय सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष दहिगाव येथे जावून पाहणी केली.

उजनी धरणातील पाणीपातळी खोल गेल्यामुळे तसेच दुबार पंपिंग करून पाणीपुरवठा करमाळा शहरासाठी करत असल्याने अनेक अडचणी येत आहेत, यामध्ये विद्युत पुरवठा पूर्ण दाबाने होत नसून तसेच दुबार पंपिंग करणारे मोटारीला उजनी धरणातील जाळ्या येऊन अडकत असल्यामुळे दुबार पंपिंग करणारे मोटारी बंद पडत आहेत, त्यामुळे करमाळा शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे आणि हीच वस्तुस्थिती पाहण्यासाठी करमाळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक संजय सावंत, पाणीपुरवठा अधिकारी फिरोज शेख, फारुक जमादार, मार्तंड सुरवसे, राजेंद्र वीर, पांडुरंग सावंत आदी जणांनी वस्तुस्थिती जाणून घेतली.

दहिगाव स्टेशनवर कायम कर्मचारी नसल्यामुळे संपूर्ण जबाबदारी ठेकेदाराकडून पुरवण्यात येणाऱ्या मजुरांकडे आहे, त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी शासनाने त्वरित भरावी अशी मागणी यावेळी माजी नगरसेवक संजय सावंत यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!