श्री कमलाभवानी मंदिरात पाडव्यानिमित्त भाविकांची गर्दी – महिलांनी घेतले रांगेत दर्शन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : श्री देवीचामाळ (ता.करमाळा) येथील श्री कमलाभवानी मंदिरात पाडव्यानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. कमलाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी महिलांनी मोठ्या रांगेत दर्शन घेतले.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी आज (ता.२२) सायंकाळी श्री कमलाभवानी मंदिरात दर्शनाचा आनंद घेतला. यामध्ये प्रामुख्याने महिलांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. मंदिरात आज पाडव्याच्या दिवशी गाभाऱ्यात सजावट केली होती. याप्रसंगी मंदिरात लहान मुलांसाठी खेळणी व खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले होते. त्यामुळे मंदिर परिसर बहरून गेला होता व यात्रेचे स्वरूप दिसून आले.