पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केम येथे शालेय साहित्यांचे वाटप - राष्ट्रवादी करणार 10 गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च.. - Saptahik Sandesh

पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केम येथे शालेय साहित्यांचे वाटप – राष्ट्रवादी करणार 10 गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्थ अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केम (ता.करमाळा) येथील राजाभाऊ तळेकर विद्यालय येथे विध्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. तसेच 10 विध्यार्थी दत्तक घेऊन त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने युवा कार्यकर्ते गौरव नाईकनवरे-पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष संतोष वारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक आव्हाड, अच्चूत काका तळेकर, प्रशालेचे अध्यक्ष महेश तळेकर, संस्थेचे सचिव तळेकर सर यांच्यासह विद्यालयाचे सर्व शिक्षक, विध्यार्थी व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!